इतिहास

देवि त्वं भक्त सुलभे सर्व कार्य़ विधायनी ।
कलौ हि कार्य सिध्यर्थ मुपायं ब्रुहि यत्नतः

कलियुगामध्ये ऐहिक व पारलौकीक सुख देणारी, उपासनेद्वारे मानवी जीवनास पूर्णानंद देणारी, महाराष्ट्रातील तीन शक्तीपीठापैकी, श्री क्षेत्र माहुरगड निवासिनी रेणुका मातेचा अंशावतार असणारी स्वयंभू, जागृत व भक्तांच्या नवसास पावणारी आई जगदंबादेवी म्हणजेच श्री क्षेत्र मोहटादेवीगड निवासिनी श्री भगवती मोहटादेवी होय.

अंदाजे निजामकाळाची असणारी ही हकीकत त्या काळी श्री माहुरगड निवासिनी रेणुका मातेची भक्ती करणारी मोहटा गावातील भक्त श्री. बन्सी दिहफळे, हरीभाऊ, गोपाळ आदी भक्तांच्या दीर्घ तपश्चर्यने व श्री भगवान नवनाथादि महान संताच्या पदस्पर्शाने कर्मयोेगाचरणे, चपाचरणाने परम पुनीत झालेल्या या पुण्यभुमीमध्ये गर्भिगरी पर्वताच्या रांगेमध्ये असणार्या उंच अशा डोंगरावर एकाच्या कैवारे उघडी बहुतांशी अंतरे या न्यायाने अनेक भक्तांच्या, जगताच्या कल्याणार्थ श्री भगवती रेणुकामाता अवतीर्ण झाली. तिच श्री भगवती मोहटादेवी होय. पाथर्डी शहरापासून 9 कि.मी. अंतरावर असणारे हे स्वयंभू जागृत ठिकाण म्हणजेच श्री क्षेत्र मोहटादेवी गड.

महाराष्ट्रामध्ये मुसलमानी राज्य बादशहा औरंगजेबाची क्रुर राजवट. या अधर्म क्रुरतेतून समाज मुक्त व्हावा यांच्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा अवतार. त्यांनी कार्यचा संकल्प केला तो श्री भगवती जगदंबा कृपेने सफल झाला. क्षत्रिय कुलावंतस गोब्राम्हण प्रितपालक राजाधिराज अशी प्रसिद्ध त्यांनी मिळविली. पुढे इंग्रजांचा राज्यसत्तेची भारतामध्ये वाढ होऊ लागली व इकडे निजामाची राजवट हैद्राबादचे राज्य इंग्रजांनी आधुनिकीकरण सभ्यतेच्या द्वारे प्रलोभने वाढिवली व भारतीय संस्कृती व सभ्यता यांमध्ये अंतर पडू लागले. मनुष्य वास्तवापासून दूर जाऊ लागला. आर्थिक क्षेत्रामध्ये असमतोल वाढून, आत्मोन्नती, जीवानानंद या पासून मनुष्य दूर जाऊ लागला. निजामराजवटीचा जाच तर इंग्रजांची भौतिक सुखाचा वाढती सभ्यता यात मनुष्य अडकला व या मोहपाशातून सुटण्यास दुर्बल झाला.

पुढे वाचा....
 
 
 
इथे क्लिक करा
 
 
 
© २०१० श्रीमोहटादेवी संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखिव आहेत.