पुजा पद्धती

श्री मोहटा देवीची पुजा करण्याच्या पद्धती :-

  १. राजोपचार पुजा
    यामध्ये देवीची षोडशोपचार पुजा करुन पात्रा साधनादि तंत्राने विधिवत छत्र चामर ई राजोपचार अर्पण करतात. महाभिषेक होऊन महावस्त्र अर्पण करुन महानैवेद्य दाखवतात.
  २. महापुजा
    षोडश उपचार पुजा होऊन भकत इच्छेनुसार, रुद्र, पवमान, पुरुषसुक्त, हिरण्यसुक्त आदि मंत्राने अभिषेक केला जातो.
  ३. लघुरुद्राभिषेक
    रुद्राची 121 आवर्तनाचा महाभिषेक पुजन, महावस्त्र महानैवेद्य समर्पण.
  ४. श्री सप्तशती पाठ वाचन
    नवचुंडी शतचंडी, सहस्त्रचंडी, अयुनचंडी, लक्षचंडीपाठाचे अनुष्टाण व दशांश हवन केले जाते.
  ५. अर्चन
    देवीस सौभाग्यद्रव्य, फलपुष्प, नाणी, आदि द्रव्यांने सहस्त्रनामाने अर्पण केली जाते.
  ६. भोगी
    देवीस साडीचोळी सौभाग्य अलंकारी, सोन्याचे चांदीच्या वस्तू समर्पण करुन महानैवेद्य समर्पण होतो.
  ७. जप
    जप, देवीसुक्त, देवीकवच, देवी स्त्रोतांचा जप करुन देवीची पुजा अभिषेक नैवेद्य केला जातो.
  ८. दंडवत
    लोटांगण घालीत पायरया चढणे व दर्शन घेणे लहान मुलांचे जावळ काढणे ही दंडवत पुजा.
  ९. पारडीपुजा
    देवीची पारडी, मीठ, शिधा, धान्य खण, नारळ, यांनी भरणे.
  १०. गोंधळ
    आरोधी, गोंधळी यांचे कडून देवीचे गुणगाण श्रवण करणे व नैवेद्य समर्पण करणष.
  ११. पोत
    चिंध्यांचा मोठा काकडा तेल घालून पेटवणे व देवीची गाणे म्हणणे.
  १२. प्रदक्षिणा
    प्रदक्षिणा मार्गाने देवीस शक्य तेवढ्या नाम घेऊन प्रदक्षिणा करणे.
  १३. वस्तू समर्पण
    देवीस सौभाग्य अलंकारीक वस्तू समर्पण करणे पायरयांच्या संख्येनुसार श्रीफळ अर्पण करणे.
  १४. महादक्षिणा
    रोज आपल्या गल्ली देवीची दक्षिणा पेटी ठेवून वर्षभरात जमेल तेवढील दक्षिणा देवीस दानपेटीत समर्पण करणे.
  १५. ध्यान चिंतन
    रोज देवीची आपल्या घरी पुजा करुन ध्यान करणे.
  १६. छबीना पालखीची
    उत्सवामध्ये देवीगडावर देवीच्या पालखक्षची मिरवणूक असते त्यावेळी सेव अर्पण करणे.
  १७. तांबुल
    नागवेलीच्या पानाचातांबुल देवीस अर्पण करणे.
  १८. प्रचार
    श्री मोहटादेवीच्या भावभक्ती उपासनेचा प्रचार करणे.
 
 
 
इथे क्लिक करा
 
 
 
© २०१० श्रीमोहटादेवी संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखिव आहेत.