धार्मिक उत्सव

मासीक उत्सव -

  १. दर पौर्णिमेस महाभिषेक पुजा, रात्री, ८ ते ९ अन्नदान
  २. ९ ते ११ किर्तन, ११ ते पहाटे ४ हरीजागर

वार्षिक उत्सव -

  १. चैत्र शु. प्रतिपदा ते रामनवमी – वा नवरात्रोत्सव श्रीराम जन्मोत्सव.
  २. श्रावण वद्य ८ श्री कृष्ण जन्मोत्सव
  ३. भाद्रपद ४ ते ४० श्री गणेशोत्सव
  ४. आश्विन शु. १ ते ९ शारदीय नवरात्रोत्सव
  ५. आश्विन शु. ११ प्रगट दिन आनंदोत्सव
  ६. कार्तिक शु. १ मोहटागावामध्ये चांदीच्या मुखवटा पुजन दर्शन सोहळा.
  ७. मार्गशिर्ष शु. १५ दत्तजन्मोत्सव
  ८. पौष शु. ७ ते १५ शाकंभरी नवरात्रोत्सव
  ९. माघ वद्य ३० महाशिवरात्र
  १०. फाल्गुन शु. १५ होळी पुजन
  ११. चैत्र शु. १५ श्री हनुमान जन्मोत्सव
  १२. शारदीय नवरात्र महोत्सवातील कार्यक्रम आश्विन शु. प्रतिपदा श्री मोहटादेवी मुखवटाची सुवर्ण अलंकारासह मोहटे गावांपासून श्री क्षेत्र मोहटादेवी गडापर्यंत सवाद्य मिरणवूक श्री मोहटादेवीची महापुजा अभिषेक व घटस्थापना, श्री सप्तशती पाठ वाचनास प्रारंभ.
  १३. आश्विन शु. ९ होम हवन, कुष्मांड बलीदान पुर्णाहुती
  १४. आश्विन शु. प्रतिपदा ते महानवमी पर्यंत नित्य अखंड हरीनाम सप्ताह, काकडआरती भजन रात्रौ ९ ते ११ हरीकिर्तन श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण, जागण गोंधळी आराधी यांची गाणी.
  १५. विजयादशमी – श्री क्षेत्र पैठण, त्र्यंबकेश्वर आदि तिर्थाचे देवीस स्नान (कावडीचे पाणी) सिमोलंघन शमीपुजजन
  १६. प्रगटदिनोत्सव छबीना मोहटेगावापासून देवीगडापर्यंत पालखीची सवाद्य मिरवणूक दर्शनसोहळा रात्रौ ८ ते प. ३ आश्विन १२ नामांकित मल्लांचा चंगी हंगामा.
  १७. बलिप्रतिपदा (पाडवा) मोहटे गावात श्री मोहटादेवीचा मुखवटा दर्शन सोहळा.
 
 
 
इथे क्लिक करा
 
 
 
© २०१० श्रीमोहटादेवी संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखिव आहेत.