कलियुगामध्ये ऐहिक व पारलौकीक सुख देणारी, उपासनेद्वारे मानवी जीवनास पूर्णानंद देणारी, महाराष्ट्रातील तीन शक्तीपीठापैकी, श्री क्षेत्र माहुरगड निवासिनी रेणुका मातेचा अंशावतार असणारी स्वयंभू, जागृत व भक्तांच्या नवसास पावणारी आई जगदंबादेवी म्हणजेच श्री क्षेत्र मोहटादेवीगड निवासिनी श्री भगवती मोहटादेवी होय.
देवीच्या दर्शनासाठी प्रतिवर्षी न चुकता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून श्री मोहटा देवीचे भक्त मातेचे दर्शन घेण्यासाठी येत असतात व जाताना एक वेगळीच उर्जा आपल्या सोबत घेऊन जातात.
भक्तांना राहण्यासाठी तसेच भाविकांच्या भोजनासाठी मंदिर संस्थानातर्फे भक्त निवासाची सोय करण्यात आलेली आहे. याशिवाय विशेष अतिथी (VIP सुट्स) निवास व्यवस्था वातानुकूलित आहे.
शारदीय नवरात्र महोत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदा रविवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ घटस्थापनेपासून आश्विन शुद्ध पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर२०२३ या कालावधीमध्ये श्रीक्षेत्र मोहटादेवी देवी गड येथे संपन्न
दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री मोहटा देवीचा वार्षिक उत्सव भाविकांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.