श्री मोहटादेवी अवतार कथा

धर्म रक्षावया अवतार घेसी | आपुलीया पाळीशी भक्‍तजना ||

सज्‍जनांनो,

माहूरगड निवासिनी श्री रेणुकामातेचा अंशावतार म्‍हणजेच श्री मोहटादेवी रेणुका माता होय . श्रीक्षेत्र मोहटादेवी गडाचा परिसर म्‍हणजे गर्भगिरी पर्वत रांगेतील होय. याच रांगेतील मोहटा गावालगतच्‍या उंच अशा डोंगरावर श्री रेणुकामातेने अवतार धारण केला. पूर्वीच्‍या काळी श्री नवनाथांनी शाबरी विद्या कवित्‍व सिद्धीसाठी भगवान श्री वृद्धेश्वर आदिनाथांना प्रसन्‍न करुन एक महायज्ञ केला. यज्ञेश्‍वरी श्रीशाबरी देवी प्रसन्‍न झाली त्‍यावेळी सर्व ऋषीमुनी देवगणांनी व नाथांनी आपल्‍या दिव्‍य सामर्थ्‍यांनी देवीस पाचारण केले. तेव्‍हा देवीने नाथांना कवित्‍वाचे वरदान दिले. प्रार्थना केली. देवीने तथास्‍तु म्‍हणून वरदान दिले. तिथेच भगवान श्री वृध्‍देश्‍वराचे स्‍वयंभू लिंग आहे. शेजारीच श्री मत्‍स्‍येन्द्रनाथ मायंबा व श्री कानिफनाथ मढी यांचे संजीवन समाधी स्थानआहे. माणसे मोहरुपी राक्षसाकडून त्रस्तहोऊन मोहपाशामध्‍ये अडकवून अविचारी आसुरी बनत चाललेली होती. दुष्‍ट प्रवृत्‍ती द्वारे सज्जनाचा छळ होऊ लागला होता.

‘संगात् संजायते काम कामात् क्रोधीद भिजायते |

क्रोधातभवती संमोह संमोहत् स्‍मृती विभ्रम: ||

स्‍मृती श्रृंशात बुध्‍दीनाशो बुध्‍दी नाशात् प्रण:शति ||

या श्री कृष्‍ण वचनाप्रमाणे मोह पाशात अडकलेला मनुष्‍य जीवनाचे महत्‍व विसरतो, त्‍यास स्‍वत:ची ओळख रहात नाही व कालांतरे भ्रमिष्ठ होतो व जीवनाचा नाश होतो. अशीच अवस्‍था निर्माण झाली होती.

”यदा यदा हि धर्मस्य ग्‍लानिर्भवति भारत |

अभ्‍युत्‍यानमधर्मस्‍य तदात्‍मानं सृजा म्यहं ||

जेव्‍हा जेव्‍हा धर्मग्‍लानि होऊन मनुष्‍यास दु:ख प्राप्‍त होते, तेव्‍हा, तेव्‍हा भगवान पृथ्‍वीवर अनेक रुपाने अवतार धारण करुन धर्म संस्‍थापना व मानवाचे कल्‍याण करतात. याच न्‍यायाने भगवती श्री रेणुका मातेने गर्भगिरी पर्वन रांगेतील मोहटागावां लगतच्‍या उंच अशा डोंगरावर अवतार धारण केला. स्‍वयंभू म्‍हणजे स्‍वनिर्मित देवी, स्‍वत: प्रगट झाला व संत श्री बन्‍सीबाबा दहिफळे व भक्‍तगणांना आश्विन शु. //११// दिनी साक्षात्‍कार दिला. जन माणसाच्‍या अंत:करणात उत्‍पन्‍न झालेला मोहरुपी राक्षस मानवाचे जीवन उद्ध्‍वस्‍त करु लागला आहे पाहूनश्री मोहटादेवीच्‍या रुपाने श्री रेणुका मातेने अवतार धारण करुन या मोहरुपी राक्षसाचा दारुण पराभव केला व जगता, मानवास सन्‍मार्ग उपासपा मार्ग देऊन अभय दिले.

।। देवापाशी आहे सर्वदा अभय ।।

।। मानवाचे भय मानवाला ।।

ही भय निवृत्‍ती होऊन उपासनेद्वारे संकल्प सिद्धीची अनुभुती येऊ लागली, म्‍हणूनच नवसाला पावणारी श्री मोहटादेवी असे म्‍हणून भक्‍तगण उदोकार जयजयकार करु लागले.