पूजा विधी

भावीकांनी पूजाविधीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, संपर्क क्र. ०२४२८-२३२१००, २३२०००, ७७४४९२०२२२

पूजा पद्धती

शक्‍तीपीठ श्री क्षेत्र मोहटादेवीगड येथे पूजा विधी पद्धतीखालील प्रमाणे आहेत.


अ.क्र. पूजा, अर्चा, पाठ प्रकार पूजा विधींचा तपशील
राजोपचार पूजा श्री मोहटादेवीची षोडशोपचार पूजा करुन सोळा श्री सुक्‍ताभिषेक होऊन पात्रासाधनादि यंत्राने उपचार व छत्र, चामर, गायन, महावस्‍त्र व महानैवेद्य पुरणपोळी पक्‍वान्‍नचा समर्पण करतात.
महापूजा श्री मोहटादेवीची षोडशोपचार पुजा करुन पुरुषसुक्‍त, पवमान, रुद्र, श्रीसुक्‍त, देवी अथर्वशीर्षमंत्रानेअभिषेक करतात.
लघुरुद्र, लघु पवमान, अभिषेक होऊन महावस्‍त्र व महानैवद्य समर्पण केला जातो.
श्री सप्‍तशती पाठ अनुष्‍ठान विधी व संकल्‍पयुक्‍त नवचंडी, शतचंडी, अयुतचंडी सहस्‍त्रचंउी, लक्षचंडी महायज्ञ केला जातो.
श्री सुक्‍त अनुष्‍ठान विधीयुक्‍त १६, १६००, एक लक्ष अशा संख्‍येने पाठ करुन दशांश हवन केले जाते.
योगीनी देव देवता विधिवत् पूजन चौसष्‍ट योगीनी, दशमहाविद्या, अष्‍टभैरव या देवतांची संकल्‍प व विधी न्‍यास ध्‍यानपूर्वक पूजा करुन मूळमत्रांनी हवन केले जाते.
अर्चन श्री मोहटादेवी उत्‍सवमुर्तीस पूजा अभिषेक करुन सौभाग्यद्रव्य फल, पुष्‍प, नाणी आदिद्रव्‍य सहस्‍त्रनामोच्‍याराने अर्पण करतात.
जपानुष्‍ठान नवार्णमंत्र, कार्योपयोगी मंत्र, विविध स्‍तोत्र, कवच इत्‍यादी मंत्राचे भक्‍तांचे इच्‍छेनुसार जपानुष्‍ठान विधिवत करतात.
पूजा भक्‍तांच्‍या संकल्‍पानुसार मंदीराच्या पाय-या चढणे, मंदीरास प्रदक्षिणा करणे, लहान मुलांचे जावळ काढणे पूजा भावीक भक्तिभावानेकरुन दानपेटीमध्‍ये दान अर्पण करतात.
परडी पूजन श्री मोहटादेवीची परडी पीठ, शिधा, धान्‍य, खण, नारळ यांनी भरणे, हया वस्‍तु अर्पण करणे ही परडी पूजा आहे.
१० गोंधळ जागरण पूजन आराधी, गोंधळी यांचे द्वारा देवीचे गुणगाण चरित्र गायन श्रवण करुन महानैवेद्य समर्पन करतात. लग्‍नानंतर जोडीनेही पूजा केली जाते. चिंध्‍याचा मोठा काकडा करुन तेल घालून पेटविणे व आरती करणे यांस पोत पाजळणे म्‍हणतात व दीपमाळीस तेल अर्पण करणे ही गोंधळजागरण पोतदीप पूजा आहे.
११ अन्‍नदान सुवासिनी पूजन श्री मोहटादेवीस साडीखण श्रीफळ, व नैवेद्य व दक्षिणा समर्पण करुन सुवासिनी व कुमारिकेची पूजा करतात आणि अन्‍नदान करतात. भावीक अन्नदानाची देणगी पावती घेतात, किंवा किरण साहित्य अर्पण करतात. व त्‍यांचे इच्‍छेनुसार अन्‍नदान केले जाते. शाश्वत अन्नदान योजना उपलब्ध असून भाविकांनी दिलेल्या दिनांकास अथवा तिथीस दरवर्षी अन्नदान केले जाते.
१२ वस्‍तु समर्पण श्री. मोहटादेवीस सुवर्ण सौभाग्‍य अलंकार, सोन्‍याचांदीचे पाळणे डोळे, गोळे, उपयोगी वस्‍तु दान पेटीमध्ये अर्पण करतात.
१३ महादक्षिणा समर्पण पूजा भावीक भक्‍त आपल्‍या संकल्‍प व इच्‍छेनुसार रोज आपल्‍या मिळकतीतून द्रव्‍य अर्पण करुन वर्षभरात जमले तेवढी रक्‍कम गडावर येऊन दानपेटीमध्‍ये अर्पण करतात किंवा देणगी पावती घेतात.
१४ छबीना पूजन आश्विन शु. एकादशीला मोहटा गांव ते श्री मोहटादेवीगड देवीची पालखीची मिरवणुक होते. यांस यात्रा सोहळा म्‍हणतात त्‍यावेळी पालखीस फुलाची चादर अर्पण करणे, भावीकांना चहा, पाणी फळ अर्पण करणे व महिलांनी पालखीपूढे पदराने वाट झाडणे यांस छबीना पूजन म्‍हणतात.
१५ तांबूल पूजा भावीकांच्‍या इच्‍छा व शक्‍तीनुसार नागवेलीच्‍या पानांचा शंभर, पाचशे, हजार अशा संख्‍येप्रमाणे षोडशगुनी तांबुल विडा अर्पण केला जातो
१६ नामकरण संस्‍कार पूजा बाळाचे बारसे नामकरण संस्‍कार गडावर देवीस साडी खण, श्रीफळ, देणगी, नैवेद्य समर्पण करुन केला जातो.