भावी काळात भावीकांच्या कल्याणार्थ अनेक सुविधा व उपक्रम राबविण्याचे संस्थानच्या विचाराधीन आहे.
धार्मिक कार्यक्रम
- प्रात:काल आरती सकाळी ७ वा. मध्यान्हकाल आरती दुपारी १२.०० वा. सायं. ७.०० वा. आरती.
- प्रत्येक पौर्णिमेस हरिकीर्तन रात्री ९ ते ११ व भजन.
- वासंतीक नवरात्र उत्सव- चैत्र शु. ।।१।। ते चैत्र शु. ।।९।।.
- श्रीराम जन्मोत्सव – चैत्र शु. श्रीरामनवमी.
- श्री हनुमान जन्मोत्सव- चैत्र शु. ।।१५।।.
- योगीनी स्थापना वर्धापन दिनोत्सव- चैत्र शु. ।।१।। ते चैत्र शु. ।।१५।।.
- श्रीकृष्ण जन्मोत्सव- भाद्रपद शु.।।४।। ते भाद्रपद शु. ।।१५।।.
- श्री गणेशोत्सव- भाद्रपद शु. ।।४।। ते भाद्रपद शु. ।।१५।।.
- शारदीय नवरात्र कार्यारंभ पूजन- भाद्रपद शु. ।।१५।।.
- शारदीय नवरात्र घटस्थापना – आश्विन शु. ।।१।। ते आश्विन शु. पौर्णिमा
- शारदीय नवरात्र चंडीयाग होमहवन- आश्विन शु. ८/९।।.
- श्री मोहटादेवी यात्रा पालखी सोहळा- आश्विन शु. ।।११।।.
- गंगास्नान कावडीने – होमहवन द्वितीय दिनी.
- विजयादशमी शमी, शस्त्र पूजन- आश्विन शु. विजयादशमी.
- श्री लक्ष्मी कुबेर पूजन- आश्विन वद्य ।।३०।। दीपावली.
- श्रीगुरु दत्तात्रेय जन्मोत्सव – मार्गशीर्ष शु. पौर्णीमा.
- शाकंभरी नवरात्र उत्सव- पौष शु. ।।८।। पौष शु. ।।१५।।.
- शाकंभरी नवरात्र चंडीयाग होमहवन- पौष शु. शाकंभरी पौर्णीमा.
- सामुदायीक कुंकुम अर्चन सुवासिनी पूजन- आश्विन शु. ललीता पंचमी.
- सामुदायीक गोंधळ जागरण- आश्विन शु. ।।६।।.
- फुलवरा नैवेद्ये समर्पण- आश्विन शु. ।।७।।.
- दररोज त्रिकालपूजा, अभिषेक, श्री सत्यअंबा, श्री सत्यनारायण पूजा, कुंकुम अर्चन, श्रीसुक्त, श्री सप्तशती पाठ अनुष्ठान.